बुधवार, २८ एप्रिल, २०१०

पदवीनंतरचे 'आयटी' क्षेत्रातील करिअर


एस.एम.एस. वाचून पैसे कमवा त्यासाठी इथे क्लिक करा.

-------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांसाठी करिअरच्या संधी असणारे आय.टी. (माहिती तंत्रज्ञान) हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पुरे करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तऱ्हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश् सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधींचा हा थोडक्यात परिचय.कॉल सेंटर बीपीओमध्ये करिअर (कारकीर्द) संबंधी संधी : या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कॉल सेंटर आणि बीपीओ क्षेत्रात 300 बिलियन डॉलर्सपेक्षा किती तरी अधिक रकमेचा व्यवसाय उपलब्ध होत आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा.कॉल सेंटर आणि बीपीओ म्हणजे काय?आजकाल अनेक विकसित देशांमध्ये आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्येसुद्धा मोठमोठ्या व्यवस्थापनासाठी, उद्योग व्यवसायासाठी ग्राहक सेवा केंद्राची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, तक्रारी योग्य ठिकाणी पाठविणे, तांत्रिक माहिती देणे, टेलीमार्केटिंग करणे इत्यादी कामांसाठी कॉल सेंटर्स मोठ्या व्यवस्थापनांना मदत करतात. कॉल सेंटर्समधील ऑपरेटर हे काम सहज करू शकतात. बीपीओ म्हणजे बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिग.या ठिकाणी संगणकाद्वारे करता येण्याजोगी ठराविक स्वरुपाची नित्य कामे (हजेरी पत्रक- पे रोलची कामे, कर परतावा-टॅक् रिटर्न प्रिपरेशन, डेटाबेस अद्यावत करणे, इत्यादी) केली जाऊ शकतात. या कामासाठी भरमसाट पगार देऊन व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांना नोकरी देण्याऐवजी संगणकाचे ज्ञान असणारा कुठल्याही क्षेत्रातील पदवीधरांकडे हे आऊटसोर्सिंग केले जाते. यात कंपन्यांचा खूपच पैसा वाचतो अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आवश्यक पात्रता (क्वालिफिकेशन) : कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. इंग्रजीचे ज्ञान आणि संगणकाचा कुशलतेने वापर करता येणे आवश्यक आहे. संभाषण कला असावी.क्षमता (कॉम्पीटन्सी) : संगणकामध्ये भरावयाची माहिती अचुक रितीने जलद गतीने भरण्याची क्षमता असणाऱ्यांना जास्त संधी आहे. बऱ्याच परदेशी (अमेरिका इत्यादी) व्यवस्थापनांची कॉल सेंटर्स भारतात आहे. त्यासाठी परदेशी व्यक्तींचे उच्चार बोलण्याची ढब समजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही तसे उच्चार करणे गरजेचे ठरते.अर्थात हे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध आहेतच. छोट्या प्रशिक्षणाने ही गोष्टी त्वरित आत्मसात करता येणे शक् आहे. फ्रेंच, जर्मन इत्यादी परदेशी भाषा (फॉरेन लॅंग्वेज) शिकून घेणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये लवकर प्रगती करता येते.सुसंधी (ऑपॉरट्यूनिटीज) : या क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. सुरवातीला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतात. कार्यक्षमता वाढवित नेल्यास एक तो दोन वर्षांत पंधरा हजार रुपये महिना (कमीत कमी) प्राप्ती सहज होईल. आजकाल युवा व्यक्ती पदवी शिक्षण घेत असतानाच संगणकाचे ज्ञान कौशल्य हस्तगत करू शकतात. त्यामुळे पदवीधर होताच करिअरची सुरवात करता येऊ शकते आणि व्यवसायात लवकर जम बसतो. संभाषण कला, वेळेचे नियोजन तत्परता, सुस्पष्ट आवाज, नम्रता या बाबींमुळे लवकर प्रगती होते.करिअर इन टेक्निकल रायटिंग : आजकाल इलेक्ट्रॉनिक् उपकरणांचा उपयोग लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण घरी दारी करीत असतात. या उपकरणांची माहिती, वापरण्याच्या पद्धती देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक ज्ञान याबद्दलची माहिती सर्वांनाच आवश्यक असते. त्यामुळे या उपकरणाबरोबर संबंधित माहिती असलेली माहिती पत्रिका, पुस्तिका देणे निर्माण कर्त्याला आवश्यक असते. ही माहिती पुस्तिका लिहिणे म्हणजे थोडक्यात टेक्नीकल रायटिंग.या माहिती पत्रिकेत छान छान रंगीत छायाचित्रे दिल्यास त्याची उपयुक्तता वाढते उपकरणे हाताळणे सोपे जाते. ही पुस्तिका (युजर गाईड) तयार करण्याचे काम एक चांगले करिअर क्षेत्र बनले आहे. सॉफ्टवेअर मॅन्युल तयार करणे याच प्रकारात मोडते.पात्रता : कुठल्याही शाखेतील पदविधारक, ज्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असेल आणि लेखन शैलीचे कौशल्य असेल त्या व्यक्ती हे करिअर समतेने करू शकतात.ऍनिमेशन, मल्टीमिडिया क्षेत्रातील करिअरसध्याचे युग हे जाहिरातीचे युग समजले जाते. जेवढी जाहिरात आकर्षक लक्षवेधी तेवढा व्यापार जास्त हे गणितच बनले आहे. आकर्षक रंगसंगती बरोबरच मोजक्या शब्दात महत्त्वाची माहिती देणे हे वैशिष्ट्य ठरत आहे.त्याशिवाय चित्रपट, दृकश्राव्य माध्यमे, टीव्ही मालिका, वेबसाईटस इत्यादीमध्ये ऍनिमेशनचे महत्त्व उपयोग दिवसेंदिवस अनेक पटीने वाढतो आहे. त्यासाठी या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना अमाप संधी आहे.पात्रता : ज्या व्यक्तींना चित्रकलेत आवड आणि नैपुण्य प्राप्त आहे आणि ज्यांच्याजवळ वेब डिझायनिंग, 2 डी 3 डीचे ज्ञान आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती हे करिअर करू शकतील. विशेष म्हणजे पदवी शिक्षण घेत असतानाही याबाबतचे कौशल्य देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले जाऊ शकतात.संगणक हार्डवेअर, नेटवर्किंगमध्ये करिअर : संगणकांची संख्या जशी अमर्याद वाढते आहे तेवढेच अमर्याद करिअर संगणक देखभाल, दुरुस्ती इत्यादींचे होत आहे. सॉफ्टवेअर पेक्षा जास्त मागणी हार्डवेअरमध्ये दिसू लागली आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यवसायात संगणक विभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे संगणक जुळवणी, विक्री, देखभाल, नेटवर्किंग इत्यादी क्षेत्रे अमर्याद विकसित झाली आहेत. त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बॅंका, रेल्वे, विमान कंपन्या, मनोरंजन क्षेत्रे, बीपीओ इत्यादी ठिकाणी करिअर घडू शकते.पात्रता : कुठल्या शाखेत पदवीधर आवश्यक ते संगणक ज्ञान, प्रशिक्षण घेऊन या करिअरमध्ये येऊ शकतो. पदवी शिक्षण घेत असताना मोकळ्या वेळेत संगणक ज्ञान कौशल्य आत्मसात करता येऊ शकते.क्षमता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र (एम.सी.पी., एम.सी.एस.. इत्यादी) प्राप्त करऊन घेणाऱ्यांना विशेष संधी आहेत हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य देणाऱ्या प्रशिक्षण योजनाही उपलब्ध आहेत.मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लीकेशन्स : विविध शाखेतील पदवीधारकांसाठी संगणक क्षेत्रातील चांगले करिअर करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळू शकते.कार्यक्षेत्र : आय टी कंपनीमध्ये प्रोग्रॅमर (योजक) म्हणून काम करता येईल. बी. ., बी. कॉम., बी. एस्सी., बी.सी.. इत्यादी पदवीधारक हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी क्षेत्रात करिअर करू शकतात.निवड निकष : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यासाठीसाधारणत : मार्च मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. साधारणपणे 2 तासामध्ये 100 प्रश् सोडवावे लागतात आणि 200 गुणांची परीक्षा होते. गणित, इंग्रजी, लॉजिकी संबंधित हे प्रश् असतात. खात्री असल्यासच प्रश्नोत्तर देणे योग्य ठरते कारण उत्तर चुकल्यास गुण उणे होतात हे लक्षात ठेवावे. प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण आणि पाहिजे असलेल्या संस्थांसाठी भरलेला आप्शन फॉर्म, यांच्यावर आधारित विद्यार्थ्यांना एम.सी.एच्या शिक्षण देणआर संस्थेत प्रवेश मिळतो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात गणित विषयांबरोबर संगणकासंबंधी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेस, इत्यादीबद्दल शिक्षण दिले जाते. शेवटच्या वर्षी एखाद्या कंपनीत प्रोजेक्टचे कामही करावे लागते. कॅम्पस्इंटरव्ह्यूमध्ये विविध परीक्षांतील सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकविणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड प्राधान्याने होते. यावेळी गटचर्चा, मुलाखत याद्वारे निवड निश्चित केली जाते.क्षमता वृद्धी : शिकत असतानाच काही परदेशी भाषा शिकणे, लवकर नोकरी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट : संगणकाच्या मदतीने व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक कामे सुकर होतात.कार्यक्षेत्र : माहिती तंत्रज्ञान शाखेत करिअर करता येते.पात्रता : आर्टस्कॉमर्स इत्यादी शाखेमधील पदवी. हा पदव्यूत्तर कोर्स करताना व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक विषयांचा अभ्यास करावा लागतो. शिवाय सॉफ्टवेअर मार्केटिंग इत्यादी विपणन विषयही शिकावे लागतात.बीएसस्सीनंतर आयआयटीमध्ये करिअर : आयआयटीसारख्या जागतिक मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकण्याचे स्वप्न फक्त इंजिनिअर होणाऱ्यांनीच बाळगावे, असे नव्हे. बी.एस्सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आय.आय.टी. संस्थेत प्रवेश मिळवून एम.एस्सी करू शकतात.कार्यक्षेत्र : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित, स्टॅटिस्टिक्, काम्पुयटर ऍप्लीकेशन्‌, बायोटेक्नॉलॉजी जिओफिजीक् या विषयात एमएसस्सी करण्याची संधी आहे.निवड प्रक्रिया : बी.एस्ससीच्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या किंवा बी.एस्सी परीक्षेत 55 टक्क्यांपेका जास्त गुण मिळविणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेला बसावे लागते. यासाठी खालीलपैकी कोणतेही दोन विषय निवडून त्या विषयासाठीची आयोजित 3 तासांची लेखी परीक्षा द्यावी लागते.विषय : फिजिक्, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्, स्टॅटिस्टिक्, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्‌, बायोटेक्नॉलॉजी, जिओफिजिक्, जिऑलॉजी. बायोटेक्नॉलॉजी कॉम्प्युटर अप्लिकेशन्स या विषयांचे पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात, तर इतर सर्व विषयांचे पेपर्स मात्र ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह (दीर्घ उत्तरी) प्ररकारचे असतात. दरवर्षी डिसेंबर/जानेवारी महिन्यात प्रवेश परीक्षेसंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध होतात.

सौजन्य : डॉ. अजित थेटे, सहसंचालक, तंत्रशिक्षण

तयारी MPSC ची - आनंद पाटील

एस.एम.एस. वाचून पैसे कमवा त्‍यासाठी इथे क्लिक करा.
अगदी बी.ए. , एम.ए. पासून ज्यांनी इंजिनिअरिंग, व्हेटरनरीच्या डिग्री मिळवल्या आहेत त्या प्रत्येकाला एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं वेड कधीतरी असतंच असतं. आणि म्हणूनच ही मूलं या परीक्षेची तयारी करतात. एमी.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीबद्दल आणि त्या परीक्षेत कसं यश मिळवलं पाहिजे, एम.पी.एस.सी.चा अभ्यास कसा केला पाहिजे, या मुद्द्यांना अनुसरून सर्वसमावेशक अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत स्टडी सर्कलचे आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केलं.एम.पी.एस.सीचं वेड शहरी भागापेक्षा ग्रामीण महाराष्ट्रात जास्त आहे. इंटरव्ह्यू तर अगदी येऊन ठेपले आहेत. शेवटच्या क्षणी तुम्ही काही टीप्स द्याला का ?आनंद पाटील : पूर्वी एम.पी.एस.ची परीक्षा ही 100 मार्कांची होती. यंदा पहिल्यांदाच ती 200 मार्कांची आहे. 1600 मार्कांची परीक्षा यापूर्वी झालेली आहे. आता या 1800 गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जर 1 हजार 500 किंवा 1100 गुण मिळवले तर मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो. पूर्व परीक्षांचा निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1600 पैकी 847 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांनी चिंता करण्याचं कारण आहे. एमपीएससीत ओेबीसीसाठी जो स्पोटर्स कोटा आहे त्यातलं उत्तीर्ण होण्याचं प्रमाणं महाविद्यालयांसारखं 40 टक्क्यांचं आहे. ज्यांना 442 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांना मुलाखतीत बोलावलं जाणार आहे. मुलाखतीची चांगली तयारी केली 200 पैकी 150 पर्यंत गुण एखाद्या विद्यार्थ्याला सहज मिळू शकतात.स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे ?आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांमधून निवडला जाणारा उमेदवार हा एखाद्या विभागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, एखाद्या विशिष्ट खात्याचा प्रमुख असतो. त्याच्याकडची निर्णय क्षमता, परिस्थितीला आकलन करून घेण्याची क्षमता, समस्यांवर तोडगा काढण्याची कुवत उमेदवारात असायला हवी. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे ती क्षमता असायला हवी. आणि याचीच चाचपणी ही मुलाखती दरम्यान केली जाते. यासाठी मुलाखती दरम्यान उमेदवाराला एखादा प्रश्न विचारला असता त्यानं तो नीट ऐकला पाहिजे. प्रश्न विचारण्याला काय उत्तर अपेक्षित आहे, याचा अंदाज विद्यार्थ्याला असायला हवा. दिली गेलेली उत्तरं ही मुद्देसूद, परिणमकारक आणि जास्त वेळ घेणारी असता कामा नये. ती क्वीक आणि सेन्सिबल असायला हवी. मुलाखत ही 15 ते 20 मिनिटांची असते. तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या खिडकीत तुम्ही 200 गुणांसाठी कसा चांगला निर्णय घेता हे दाखवायचं असतं. संख्यात्मक उत्तरं देण्यापेक्षा आपली उत्तरं ही गुणात्मक किती दर्जेदार असतील याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असायला हवा. ब-याचवेळा आपण टिपिकल साचेबद्ध इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. उमेदवाराकडची ओरिज्नॅलिटी जशीच्या तशी मुलाखत देताना बाहेर आली पाहिजे.मुलं मुलाखतीचं प्रचंड टेन्शन घेतात. तर हे टेन्शन येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ?आनंद पाटील : टेन्शन घ्यायचं नसेल तर उमेदवाराकडे आत्मविश्वास असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. हा प्रश्न विचारला तर ब-याच मुलांना भीती वाटते. मी जर बाजूनं बोललो तरी मला गुण पडणार नाही. बाजूनं नाही बोललो तरी मला गुण मिळणार नाहीत, ही भीती विद्यार्थ्यांना वाटत असते. तर ही भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे भूमिकेची निश्चितता असायला हवी.यु.पी.एस.सी. , एम.पी.एस.सी परीक्षांचे फॉर्म कधी निघतात ?आनंद पाटील : निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघतात. त्या जाहिरातींवर लक्ष ठेवलं पाहिजे. या एका आठवड्यामध्ये विक्रीकर निरीक्षकाच्या पदांसाठीच्या परीक्षेचे फॉर्म निघतील. तर या परीक्षांच्या जाहिरात प्रसिद्धीनंतर साधारण महिन्याभराचा वेळ दिला जातो. हा वेळ परीक्षेच्या तयारीसाठी असतो. यु.पी.एस.सीच्या वर्षाला साधारण 16 परीक्षा होतात. एम.पी.एस.सीच्याही साधारण तेवढ्याच परीक्षा होतात.सद्यस्थितीत आपल्याला दोन प्रकारचे ट्रेन्डस् पहायला मिळत आहे. एकीकडे डॉक्टर , इंजिनिअर होण्यासाठी धडपडणा-या मुलांचा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या विद्यार्थ्यांचा एक वर्ग पहायला मिळतो. तर या स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या मुलाचं प्रमाण तरी काय आहे ? दरवर्षी लाखांच्या संख्येनं विद्यार्थी परीक्षेला बसतात का ?आनंद पाटील : महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे त्यात साधारणपणे दीड हजारांपेक्षा जागा स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून भरल्या जातात. या स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं किमान वय हे 19 आणि ओबीसी आणि इतर जातीेंसाठी 39 वर्षं आहे. तसं आयोगानं ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार साधारणपणे तीन कोटी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. यातले पदवीधर विद्यार्थी हे 40 टक्के असतात. तर साधारण 40 लाख विद्यार्थी या परीक्षांना पात्र ठरणारे असतात. स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्यक्ष तयारी करणारे विद्यार्थी 4 लाख असतात. प्रत्यक्ष बसणारे 2 ते अडीच लाख असतात. दोन - अडीच लाखांतून दीड हजार विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षांसाठी केली जाते.सैन्यदलात काम करणा-या माजी सैनिकांना जर एम.पी.एस.सी.ची परीक्षा द्यायची असेल तर काही स्पेशल तरतूद आहे का ?आनंद पाटील : माजी सैनिकांसाठी गेल्यावर्षीपर्यंत मंत्रालयातल्या पी.एस.आय., एस.पी.आय. या मंत्रालयातल्या जागांसाठी परीक्षा होत्या. या परीक्षांच्या वयोमार्यादेत सूट होती. त्यामुळे असे विद्यार्थी वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायचे. पण आता अशा स्वरूपातल्या परीक्षा देणं बंद केलं आहे. सैन्यदलासाठीचा स्पेशल कोटा बंद केला आहे. पण आता 38 वर्षं वयाचा डिफेन्समध्ये नोकरी करणारा उमेदवार ओबीसी किंवा इतर कोणत्याही अनुसुचित जाती जमातींपैकी असेल तर तर तो देऊ शकतो. डिफेन्समध्येअसणारा 33 वय वर्षं असणारा ओपन कॅटेगीरीतला विद्यार्थी मंत्रालयातल्या क्लास थ्रीच्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो. इन सर्व्हिसमध्ये असताना परीक्षा देता येतात. पण डिफेन्ससाठीचा स्पेशल कोटा पदांचं अपग्रेडेशन केल्यापासून रद्द केला आहे.विज्ञान शाखेतून शिक्षण शिकत असलेल्या एम.पी.एस.सी.च्या परीक्षांसाठी काय स्कोप आहे ?आनंद पाटील : चांगला स्कोप आहे. 19 किंवा 20 व्या वर्षी जर विद्यार्थ्यांनी एमपीएसची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झालात डेप्युटी कलेक्टर होता येतं. आणि चाळीसाव्या वर्षी परीक्षा न देता आय.एस होता येतं. इथे तुम्हाला वरची जागा मिळते.साधारणपणे या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी किती आधीपासून तयारी करावी ? सामाजिक प्रश्नांची जाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत ?आनंद पाटील : स्पर्धापरीक्षांसाठी आवश्यक असणारं ज्ञान साधारणपणे आपल्याला कोणत्याही शाखेतून मिळतं. स्पर्धा परीक्षांचा बेसिक अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची मूलभूत आकलन क्षमता जाणून घेण्यासाठीचा असतो. त्यामुळे आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थ्यानं काय वाचलंय, कसं वाचलंय, ते लक्षात कसं ठेवलंय, समजून घेऊन केलंय की नाही यावर अवलंबून असतं.आणि हेच स्पर्धा परीक्षांच्या बेसिक तयारीत तपासून पाहिलं जातं. समजा कोणत्याही विद्यार्थ्याला 20 व्या किंवा 21 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी साधारणपणे 12 व्या किंवा 13 व्या वर्षापासून करायला हवी. लहानातली लहान प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.एपीएससीची परीक्षा देताना परीक्षेचं माध्यम काय असावं ?आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना साधारणपणे लेखी आणि मुलाखत देताना परीक्षेचं माध्यम साधारणपणे सारखंच असावं. लेखी परीक्षेला वेगळं माध्यम आणि मुलाखतीला वेगळं माध्यम असं असू नये. इंग्रजीतून बोलता येत नसेल तर दुभाषिकाचा उपयोग करावा. मराठी भाषेचा वापर करून स्पर्धा परीक्षा देता येते. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी. ते स्पर्धा परीक्षेत भारतातून दुसरे आले होते. त्यांनी मराठी भाषेतूनच स्पर्धा परीक्षा दिली होती.इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ?आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ?आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्यासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्‌ना या दोन्ही परीक्षा देता येतात.हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला ?आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणविभागणीपूर्वपरीक्षेच्या गुणांकाची विभागणीएकूण गुण :200कला/समाजशाखा : 30बौध्दिक चाचणी : 50चालू घडामोडी : 30शास्त्र आणि तंत्रज्ञान :30वाणिज्य आणि अर्थशास्त्र :30शेती : 30मुख्य परीक्षा गुणांकाची विभागणीमराठी :200सामान्य अध्ययन 1 :200सामान्य अध्ययन 2 :200वैकल्पिक विषय 8 पेपर :1600महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )* महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील वर्ग 1 आणि2 अधिकारी निवडण्यासाठी राज्य पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे( MPSC )राज्यसेवा परीक्षा घेतल्या जातात.* कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.पदवीच्या टक्केवारीची अट नसते.* पदवी परीक्षेतील रिपीट विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतो.* ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी किमान 19 आणि कमाल 33 वर्षे वय असावे लागते.* आरक्षित वर्गातल्या विद्यार्थांकरता कमाल वयोमर्यादा 33 +5=38 अशी आहे.* अपंगांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे.* विद्यार्थांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.* पोलीस खात्यातील भरतीसाठी आवश्यक ती शारीरिक पात्रताही विद्यार्थंाकडे असावी लागते.* मुख्य टपाल कार्यालयांमध्ये अर्जासह माहितीपुस्तिका 100 रुपयांना मिळते.* खुल्या वर्गासाठी परीक्षा फी -250 रु* मागासवर्गासाठी परीक्षा फी-125 रु* राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, विक्री कर अधिकारी , शिक्षणाधिकारी,मंत्रालय कक्षाधिकारी, गटविकास अधिकारी सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.* पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असतो त्याला सामान्य क्षमता चाचणी म्हणतात. त्यात विद्यार्थांने दोन तासांत 200 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात.* प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध असतात.* ही परीक्षा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात घेतली जाते.* पेपरच्या अभ्यासक्रम 12 आणि पदवीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.1-पूर्वपरीक्षायात ऑप्शनल प्रश्न असतात.2-मुख्य परीक्षावर्णनात्मक प्रश्न असतात.3- मुलाखत* उमेदवारचे व्यक्तिमत्व,सामाजिक राजकीय प्रश्नांचा अभ्यास,आपल्या भोवताली घडणार्‍या घडामोडींबाबतची जागरुकता,त्यांची निर्णय क्षमता,प्रसंगावधान याची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात.

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

करिअर मार्गदर्शन ....

दहावी बारावी नंतर पालकांच्या मुलांच्‍या मनात करिअरचं विचारचक्र सुरू होतं. दहावीनंतर कोणत्या शाखेत जायचं आणि बारावीनंतर कोणत्या प्रवेशपरिक्षा, कोणता कोर्स ... या विचारानं सगळे झपाटून जातात. सगळं काही सुरळीत पार पडेपर्यंत विद्यार्थी आणि त्याहीपेक्षा जास्त पालकवर्ग कमालीचा अस्वस्थ असतो. अनेक जाणकार लोकांना भेटून, शक्य तितकी माहिती मिळवून त्यातून उत्तम काय ते निवडण्यासाठी प्रयत्न सुरू असतात ... हुशार मुलं असलेल्या घरांमधेच हे चित्र दिसतं असं नाही, तर एकंदरीत घराघरातलंच चित्र बदललंय। असंख्य कोर्सच्या भाऊगर्दीत आणि करिअरच्या जंजाळात प्रत्येकाला अचूक आणि नेमका निर्णय घ्यायचाय।
या निर्णय प्रक्रियेत तुम्‍हांला मदत करण्‍यासाठी करिअर सेंटर म्‍हणजेच Your Complete Guide to Selecting a Career त्‍यासाठी इथे क्‍लीक करा.

सोमवार, १ मार्च, २०१०

चेतन भगतने सिंबॉयसिस कॉलेज मध्‍ये केलेल्‍या भाषणाचा मराठी अनुवाद


सिंबॉयसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कॉलेजमधील पहील्या दिवशी चेतन भगतने केलेले भाषण खुप प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठीचा चेतनने सांगीतलेला मुलमंत्र केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच उपयुक्त आहे. या भाषणाचा मराठी अनुवाद केला आहे नेटभेटने. हे भाषण वाचण्‍यासाठी ....

इथे क्लिक करा

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

गणिताचा क्लास

माझ्या मना या ब्‍लॉकमध्‍ये रविंद्र सरांनी गणिताचा क्‍लास नांवाचं सदर चालू केलेलं आहे। अवश्‍य पहा आणि आपल्‍या मित्रांनाही सांगा. खालील लिंक ओपन करा.
येथे क्लिक करा.

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०

एम्. पी. एस . सी. परीक्षा ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, मंत्रालय कक्षाधिकारी, तहसीलदार व इतर पदांकरीता सरळ भरती असते. या दिवसात नियोजनपूर्वक केलेला अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचा आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ‘सामान्य क्षमता चाचणी’ हा एकच पेपर असतो. एकूण २०० बहुपर्यायी प्रश्न असलेला हा पेपर २ तासांत सोडवायचा असतो. या पेपरमध्ये कला शाखा घटक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व अर्थव्यवस्था, कृषीशास्त्र, प्रचलित घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी असे सहा उपघटक असतात.

कला शाखा घटक :
कला शाखा घटकासंबंधी ३० ते ४० गुणांचे प्रश्न विचारले जातात. कलाशाखा घटक ५ भागांत विभागलेले असून प्रत्येक
विभागाला साधारणत: ६ ते ७ गुणांचे प्रश्न विचारले जातात. कला शाखा घटकातील विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
इतिहास, समाजसुधारक, भारतीय राज्यपद्धती, पंचायतराज, भूगोल.
आता आपण विभागावर माहिती घेऊ.
इतिहास : इतिहासावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. इतिहासात सनावळी लक्षात ठेवणे जरी थोडेसे कठीण असले तरी अशक्य नसते. इतिहास हा विषय अभ्यासताना ब्रिटिश सत्तेची पायाभरणी व विस्तार, ब्रिटिश सत्तेचे दृढीकरण, १८५७ चा उठाव, काँग्रेसची स्थापना, जहालांचा कालखंड, गांधीजींचा कालखंड, स्वातंत्र्यप्राप्तीकडे वाटचाल, क्रांतिकारी चळवळ, भारतीय प्रबोधनाचा कालखंड इत्यादी घटक येतात. या घटकांचा सुनियोजित अभ्यास करणे आवश्यक असते.
इतिहासासाठी खालील पुस्तके अभ्यासावीत.
(१) आधुनिक भारताचा इतिहास: भाग २ व ३ – सुमन वैद्य
(२) आधुनिक भारताचा इतिहास: जयसिंगराव पवार
समाजसुधारक : या घटकावर साधारणत: ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. महाराष्ट्रात ब्रिटिशांचे राज्य आले. त्यांची विचारसरणी- साहित्य- प्रशासन-कायदे इत्यादीमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनात प्रचंड उलथापालथ झाली. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या एका नव्या पिढीने प्रबोधनाच्या चळवळीला प्रारंभ केला. पाश्चात्त्य शिक्षण घेतल्यामुळे एतद्देशीयांमधील दोष या पिढीच्या लक्षात येऊ लागले. भारतीय वर्गव्यवस्था, जातीयता, स्त्रियांच्या समस्यांकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. समाजसुधारकांनी नियतकालिकांमधून आपले विचार मांडले. त्यांच्या समाजकार्याला कालसापेक्ष मर्यादा होत्या, परंतु पुढच्या चळवळीचा पाया त्यांनीच भक्कम केला. वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांच्या माध्यमातून समाजसुधारकांनी समाजजागृतीचे कार्य केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास या घटकांर्गत प्रश्न पुढील विषयांवर आधारित असतात.
सामाजिक संस्था, समाजसुधारक, समाजसुधारकांची ग्रंथसंपदा, वृत्तपत्रे, काही ठळक/ उल्लेखनीय घटना व वर्षे.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) भारतीय समाजसुधारक: फडके प्रकाशन
(२) महाराष्ट्रातील समाजसुधारक- चाणक्य मंडल प्रकाशन
* भूगोल : भूगोलावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भूगोल या घटकात भारताच्या भूगोलासहित महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास करणे आवश्यक असते. या भागाचा व्यवस्थित नियोजनाने अभ्यास केल्यास सर्वच्या सर्व गुण मिळू शकतात.
भारताचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक रचना, मृदा, नदी प्रणाली, वने, प्रकल्प, यावर भर असावा तर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, मृदा, वने, जलसिंचन, कृषी, ऊर्जा साधने, खनिजसंपत्ती उद्योगधंदे, लोकसंख्या, वाहतूक, पर्यटन या घटकांवर भर द्यावा.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके
(२) महाराष्ट्र- डॉ. संतोष दास्ताने
राज्यपद्धती : या घटकावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यपद्धती या घटकात भारतीय राज्यघटनेचा इतिहास, राज्यघटनेची वैशिष्टय़े, राज्यघटनेत समाविष्ट बाबी, केंद्रीय कार्यकारी व कायदेमंडळ, घटक राज्याचे कार्यकारी व कायदेमंडळ, सर्वोच्च व उच्च न्यायालय, केंद्र- राज्य संबंध, घटना दुरुस्त्या व कलमे यांचा समावेश आहे. तसेच काही महत्त्वाची पदे, त्यांची वेतने, त्यांची आवश्यकता, अधिकार व कार्य इत्यादी गोष्टींचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केल्यास राज्यपद्धतीचे सर्वच्या सर्व गुण मिळविणे अजिबात कठीण नाही.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) भारतीय राज्यपद्धती- प्रा. बी. बी. पाटील.
(२) भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार- डॉ. बाचल.
ग्रामप्रशासन : या घटकावर साधारणपणे ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. यामध्ये ग्रामप्रशासनातील तीन स्तर म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकशाही विक्रेंद्रीकरणाचा इतिहास, लोकशाही विकेद्रीकरणासाठीच्या विविध समित्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. ग्रामप्रशासनातील तीन स्तर, त्या प्रत्येक स्तरावर कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे. या सोबतच महसूल व पोलीस प्रशासन, नेमणूक, निवड इत्यादी विषयांवरही प्रश्न विचारले जातात.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) नागरिकशास्त्र : इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके.
कला शाखेतील विभागानंतर आता इतर घटकांची माहिती घेऊ.
विज्ञान-तंत्रज्ञान :
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर साधारणत: २५ ते ३० प्रश्न विचारले जातात. या विषयाचे योग्य मार्गदर्शन आणि योग्य संदर्भ पुस्तकांचा आधार घेतल्यास किंवा वाचन केल्यास हा विषय विद्यार्थ्यांस पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारले जाणारे प्रश्न खालील घटकांवर आधारित असतात. विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानातील गृहीते, वैज्ञानिक पद्धती, केवलगणन पद्धती, साम्यानुमान आणि प्रतिकृती, सिद्धांत कल्पना (अभ्युपगम), शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान, मूलभूत शास्त्रीय संकल्पना, आरोग्य, उत्पादकता, वाहतूक आणि विनिमय, परंपरा, संस्कृती, धर्म आणि मानवी मूल्ये, आधुनिकीकरण व भारतीय समाज, परिसर आणि प्रदूषण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उत्तुंग झेप, तंत्रज्ञानाधिष्ठित समाज. दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर २५ ते ३० प्रश्न विचारले जात असले तरी कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारतील हे निश्चित सांगता येत नाही आणि या विषयाच्या एखाद्या घटकाबद्दलही हेच तत्त्व लागू पडते म्हणून विद्यार्थ्यांचा या विषयासंबंधी अभ्यास सखोल असणे आवश्यक आहे.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन- सेठ प्रकाशन.
(२) इयत्ता आठवी ते दहावीची सामान्य विज्ञानाची पुस्तके.
कृषीशास्त्र :
या विषयावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. कृषी हा विषय समजण्यास सोपा व काळजीपूर्वक अभ्यास केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. कृषीविषयक घटकांत शेती व शेतीशी संलग्न विषय मोडतात. हे खालीलप्रमाणे-
जमिनीचा वापर व प्रमुख पिके. यात कृषी-हवामान, खरीप-रब्बी पिके, प्रमुख पिके, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिकांची लागवड या विषयी प्रश्न असतात.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, वनविकास व वन उत्पादने, मत्स्यव्यवसाय यावर प्रश्न असतात.
कृषी अर्थशास्त्रामध्ये शेती व्यवस्थापनशास्त्र, शेती नियोजन व अर्थसंकल्प, कृषी वित्तपुरवठा प्रकार, भू-अधिकारविषयक सुधारणा, शेतमाल विक्री व्यवस्था, भारतातील पंचवार्षिक योजना व शेती व्यवसाय या विषयावर प्रश्न असतात.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) कृषीशास्त्र- पंचम प्रकाशन.
(२) कृषी अर्थव्यवस्था- डॉ. विजय कविमंडन.
वाणिज्य व अर्थव्यवस्था :
या घटकावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. ज्या आर्थिक घटकांशी प्रशासनाचा संबंध येतो अशा घटकांवर आधारित हे प्रश्न असतात. साधारणपणे शासकीय अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना, भारतीय बँकिंग यावर जास्त भर देण्यात आलेला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था यात भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, लोकसंख्या, भारताचा आयात-निर्यात व्यापार, परकीय कर्जे, भारताचे नियोजन तर शासकीय अर्थव्यवस्था यात शासनाची आर्थिक धोरणे, भारतातील करप्रणाली याचा अभ्यास करावा. भारतीय बँकिंग यात राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिका, बँकांचे राष्ट्रीयीकरण, कृषी पतपुरवठा, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास करावा.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) देसाई व भालेराव.
(२) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) भोसले व काटे.
प्रचलित घडामोडी :
या विषयावर जवळपास २० ते २५ प्रश्न विचारले जातात. मागील दहा वषार्ंतील राज्यसेवा पूर्वपरीक्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या पटकन लक्षात येणारी बाब म्हणजे चालू घडामोडीवर पूर्वपरीक्षेच्या आधी एक ते दीड वर्षांपासून ते परीक्षेच्या अगोदर एक महिन्यापर्यंत घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. यामध्ये आपल्याला साधारणपणे दहा विभाग पाडता येतात. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी, प्रसिद्ध व्यक्ती परिषदा- स्थळे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडाविषयक घडामोडी, दिनविशेष विविध समित्या, अन्य प्रचलित घडामोडी. या घटकाचा अभ्यास करताना नियमित वृत्तपत्र वाचन असावे तसेच स्पर्धा परीक्षांकरिता वाहिलेली मासिके तसेच योजना, लोकराज्य वाचावे.
बुद्धिमापन चाचणी :
या घटकावर २०० पैकी ५० प्रश्न असतात. या विषयाच्या प्रश्नांची संख्या बघता परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या प्रश्नांवर जास्त तयारी करणे आवश्यक आहे आणि हा एकमेव विषय असा आहे की, ज्यात ठरवून पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात.
बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडविण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक ठरतात. (१) तर्कशुद्ध विचार (Logical Thinking) (२) सराव (Practice)
या दोन्हींसाठी वेगवेगळ्या पुस्तकातील विविध प्रकारचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आधीच्या प्रश्नपत्रिकांवरून बघता येईल.
या घटकात संख्या श्रेणी, संख्यारचना, संख्या संबंध, अक्षर-अक्षर संबंध, अक्षर-अंक संबंध, विसंगत पर्याय, शब्द-शब्द संबंध यावर प्रश्न असतात.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) मानसिक क्षमता कसोटी- वा. ना. दांडेकर.
(२) स्पर्धा परीक्षा- बुद्धिमापन चाचणी- वा. ना. दांडेकर.
वरील सर्व घटकांचा समावेश असणारे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयार केलेली गाईडस् व प्रश्नसंच बाजारात उपलब्ध आहेत. यांचाही अभ्यासाकरिता चांगला उपयोग होतो.
पेपर लिहिण्याचे तंत्र :
आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर लिहिण्याच्या तंत्राविषयी माहिती घेऊया.
बहुपर्यायी प्रश्नांमध्ये एक प्रश्न देऊन त्याच्या खाली अ, ब, क, ड या प्रकारे चार पर्याय दिलेले असतात व त्यातून एका योग्य पर्यायाची निवड करून त्या पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल करावयाचा असतो. त्यावरून विद्यार्थ्यांच्या त्या घटनेची किती अचूक माहिती आहे हे बघितले जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चाळणी परीेक्षा असते. यात पास झालात तरच मुख्य परीक्षेला प्रवेश दिला जातो. म्हणूनच या परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य, वेळेचे सुयोग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो.
सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे पेपरसाठी परीक्षा केंद्रावर पुरेसे आधी पोहोचणे. धांदल नको तसेच मन शांत, एकाग्र ठेवणे महत्त्वाचे असते. उत्तरपत्रिकेत एकाच प्रश्नात एकापेक्षा जास्त गोल आढळले तर त्यातील एक उत्तर बरोबर असून देखील एकूण उत्तर चुकीचे धरले जाते. त्यामुळे उत्तरांचा गोल हा विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना सलगच प्रश्न सोडवावेत, असे कुठलेही बंधन नसते, तर जसे प्रश्न येतील तसे सोडवावेत. मात्र उत्तरपत्रिकेत काळजीपूर्वक त्याच नंबरच्या प्रश्नांच्या पुढे उत्तर लिहावे, नाही तर गोंधळ निर्माण होतो. यानंतर वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे असते. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर ५ मिनिटे ती वाचण्यासाठी द्यावीत. मात्र त्या वेळी पेपर कितीही अवघड असला तरी निराश होऊ नये, अगर कितीही सोपा असला तरी हरखून जाऊ नये. कारण वरील दोन्ही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हातून जास्त चुका होण्याची शक्यता असते.
परीक्षेच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे सगळ्यांनी सारखाच अभ्यास केलेला असतो. त्यामुळे पेपर हा सर्वानाच अवघड किंवा सोपा वाटू लागतो. अशा वेळी स्थितप्रज्ञ असणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका चांगली पंधरा-सोळा पानी असते. प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या जागीच कच्चे काम करावे लागते. इतर कागदांवर कच्चे काम केल्यास ते अयोग्य मानले जाते. पेपर चाळून झाल्यावर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची. पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवताना खाली दिल्याप्रमाणे अ, ब, क हे प्रकार फार महत्त्वाचे आहेत. या तीन पद्धतीनुसार पेपर सोडवला असता नियोजित वेळेत तो पूर्ण होण्यास मदत होते.
‘अ’ प्रकार : या प्रकारात ज्या प्रश्नांची आपल्याला पूर्णपणे अचूक उत्तराची खात्री आहे तेच प्रश्न फक्त सोडवायचे असतात. एकूण २०० प्रश्नांपैकी जेवढे जास्तीत जास्त प्रश्न ‘अ’ प्रकारात सोडवता येतील तेवढे. तुमचे खात्रीचे गुण आहेत. तसेच ‘अ’ प्रकाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रश्न हे कमीत कमी वेळात सोडवू शकतो. त्यामुळे इतर अवघड प्रश्नांचा विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. म्हणून ‘अ’ प्रकार काळजीपूर्वक वापरावा. ‘अ’ प्रकारात न सोडवलेल्या प्रश्नांचे नंबर कच्च्या कागदावर टाका. त्यामुळे तेवढय़ाच प्रश्नांवर पुढील ‘ब’ व ‘क’ पद्धतीत भर देता येईल.
‘ब’ प्रकार : या प्रकारात केवळ प्रश्न पाहिल्यावर उत्तर सुचत नाही तर चारही पर्याय पाहावे लागतात. स्मरणशक्तीला थोडा ताण दिला की, उत्तर आठवते. अनेक वेळा पेपरमधील परस्पर प्रश्नांत देखील एकमेकांची उत्तरे सापडू शकतात. तसेच जोडय़ा जुळवा प्रकारात देखील नीट विचार केला तर योग्य उत्तर सापडू शकते. बुद्धिमापन चाचणीतील आकडेमोड, वेगवेगळी लॉजिक यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. या प्रकारात जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क पद्धतीत जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क प्रकारात येतात.
‘क’ प्रकार : सर्वसाधारणपणे ‘क’ प्रकार म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर अजिबात आठवत नाही, असे प्रश्न होय. सामान्यत: ‘क’ प्रकारात जेवढे कमी किंवा जास्त प्रश्न राहिले असतील त्यावरून पेपर सोपा किंवा अवघड हे समजते. पूर्वी ‘क’ प्रकारातील प्रश्नांच्या उत्तरांसाठी चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचे अक्षर निवडून सर्व क प्रकारातील प्रश्नांना त्या अक्षराचे उत्तर लिहिले जायचे. ०.२५ टक्के निगेटिव्ह मार्क पद्धती या परीक्षेला पहिल्यांदा लागू झाली आहे. त्यामुळे क प्रकारातील प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवेत. या पद्धतीला method of elimination असे म्हणतात. या पद्धतीत ४ पर्यायांपैकी एकच बरोबर असेल तर पूर्ण मटका मारण्यापेक्षा (म्हणजे चारही पर्यायांबद्दल काहीच खात्री नसणे) असे प्रश्न वेगळे लिहून ठेवावेत की ज्यात किमान १ किंवा निदान २ तरी पर्याय तुम्ही नक्की चूक ठरवू शकलेले आहात. जरी ठाम उत्तर माहिती नसेल तरीही फक्त दोनच पर्यायांतील एक पर्याय सहज निवडला, मटका मारला तरी दर ४ प्रश्नांमध्ये निदान एक तरी उत्तर बरोबर येण्याची शक्यता खूपच चांगली आहे आणि आपण हे लक्षात घेऊ की MPSC मध्ये चार प्रश्नांपैकी एक जरी बरोबर आला आणि उरलेले तीनच्या तीन चुकले तर तुमचे एकूण गुण हे बरोबरचा १ गुण व चुकलेल्या तीन प्रश्नांचे ०.७५ गुण म्हणजेच ०.२५ गुणांचा फायदा आहे. या ०.२५ गुणाधिक्यामुळे तुम्ही तुमच्या बऱ्याच प्रतिस्पध्र्याना मागे टाकलेले असते.
अ, ब, क प्रकारानुसार पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवला गेल्यास वेळेचा पूर्णपणे वापर होऊन जास्तीत जास्त गुण मिळवून यश नक्कीच खेचून आणता येईल।
स्रोत - लोकप्रभा