एस.एम.एस. वाचून पैसे कमवा त्यासाठी इथे क्लिक करा.
-------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांसाठी करिअरच्या संधी असणारे आय.टी. (माहिती तंत्रज्ञान) हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पुरे करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान व कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तऱ्हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधींचा हा थोडक्यात परिचय.कॉल सेंटर व बीपीओमध्ये करिअर (कारकीर्द) संबंधी संधी : या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कॉल सेंटर आणि बीपीओ क्षेत्रात 300 बिलियन डॉलर्सपेक्षा किती तरी अधिक रकमेचा व्यवसाय उपलब्ध होत आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा.कॉल सेंटर आणि बीपीओ म्हणजे काय?आजकाल अनेक विकसित देशांमध्ये आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्येसुद्धा मोठमोठ्या व्यवस्थापनासाठी, उद्योग व्यवसायासाठी ग्राहक सेवा केंद्राची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, तक्रारी योग्य ठिकाणी पाठविणे, तांत्रिक माहिती देणे, टेलीमार्केटिंग करणे इत्यादी कामांसाठी कॉल सेंटर्स मोठ्या व्यवस्थापनांना मदत करतात. कॉल सेंटर्समधील ऑपरेटर हे काम सहज करू शकतात. बीपीओ म्हणजे बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिग.या ठिकाणी संगणकाद्वारे करता येण्याजोगी ठराविक स्वरुपाची नित्य कामे (हजेरी पत्रक- पे रोलची कामे, कर परतावा-टॅक्स रिटर्न प्रिपरेशन, डेटाबेस अद्यावत करणे, इत्यादी) केली जाऊ शकतात. या कामासाठी भरमसाट पगार देऊन व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांना नोकरी देण्याऐवजी संगणकाचे ज्ञान असणारा कुठल्याही क्षेत्रातील पदवीधरांकडे हे आऊटसोर्सिंग केले जाते. यात कंपन्यांचा खूपच पैसा वाचतो व अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आवश्यक पात्रता (क्वालिफिकेशन) : कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. इंग्रजीचे ज्ञान आणि संगणकाचा कुशलतेने वापर करता येणे आवश्यक आहे. संभाषण कला असावी.क्षमता (कॉम्पीटन्सी) : संगणकामध्ये भरावयाची माहिती अचुक रितीने व जलद गतीने भरण्याची क्षमता असणाऱ्यांना जास्त संधी आहे. बऱ्याच परदेशी (अमेरिका इत्यादी) व्यवस्थापनांची कॉल सेंटर्स भारतात आहे. त्यासाठी परदेशी व्यक्तींचे उच्चार व बोलण्याची ढब समजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही तसे उच्चार करणे गरजेचे ठरते.अर्थात हे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध आहेतच. छोट्या प्रशिक्षणाने ही गोष्टी त्वरित आत्मसात करता येणे शक्य आहे. फ्रेंच, जर्मन इत्यादी परदेशी भाषा (फॉरेन लॅंग्वेज) शिकून घेणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये लवकर प्रगती करता येते.सुसंधी (ऑपॉरट्यूनिटीज) : या क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. सुरवातीला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतात. कार्यक्षमता वाढवित नेल्यास एक तो दोन वर्षांत पंधरा हजार रुपये महिना (कमीत कमी) प्राप्ती सहज होईल. आजकाल युवा व्यक्ती पदवी शिक्षण घेत असतानाच संगणकाचे ज्ञान व कौशल्य हस्तगत करू शकतात. त्यामुळे पदवीधर होताच करिअरची सुरवात करता येऊ शकते आणि व्यवसायात लवकर जम बसतो. संभाषण कला, वेळेचे नियोजन व तत्परता, सुस्पष्ट आवाज, नम्रता या बाबींमुळे लवकर प्रगती होते.करिअर इन टेक्निकल रायटिंग : आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण घरी दारी करीत असतात. या उपकरणांची माहिती, वापरण्याच्या पद्धती देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक ज्ञान याबद्दलची माहिती सर्वांनाच आवश्यक असते. त्यामुळे या उपकरणाबरोबर संबंधित माहिती असलेली माहिती पत्रिका, पुस्तिका देणे निर्माण कर्त्याला आवश्यक असते. ही माहिती पुस्तिका लिहिणे म्हणजे थोडक्यात टेक्नीकल रायटिंग.या माहिती पत्रिकेत छान छान रंगीत छायाचित्रे दिल्यास त्याची उपयुक्तता वाढते व उपकरणे हाताळणे सोपे जाते. ही पुस्तिका (युजर गाईड) तयार करण्याचे काम एक चांगले करिअर क्षेत्र बनले आहे. सॉफ्टवेअर मॅन्युल तयार करणे याच प्रकारात मोडते.पात्रता : कुठल्याही शाखेतील पदविधारक, ज्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असेल आणि लेखन शैलीचे कौशल्य असेल त्या व्यक्ती हे करिअर समतेने करू शकतात.ऍनिमेशन, मल्टीमिडिया क्षेत्रातील करिअरसध्याचे युग हे जाहिरातीचे युग समजले जाते. जेवढी जाहिरात आकर्षक व लक्षवेधी तेवढा व्यापार जास्त हे गणितच बनले आहे. आकर्षक रंगसंगती बरोबरच मोजक्या शब्दात महत्त्वाची माहिती देणे हे वैशिष्ट्य ठरत आहे.त्याशिवाय चित्रपट, दृकश्राव्य माध्यमे, टीव्ही मालिका, वेबसाईटस इत्यादीमध्ये ऍनिमेशनचे महत्त्व व उपयोग दिवसेंदिवस अनेक पटीने वाढतो आहे. त्यासाठी या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना अमाप संधी आहे.पात्रता : ज्या व्यक्तींना चित्रकलेत आवड आणि नैपुण्य प्राप्त आहे आणि ज्यांच्याजवळ वेब डिझायनिंग, 2 डी व 3 डीचे ज्ञान आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती हे करिअर करू शकतील. विशेष म्हणजे पदवी शिक्षण घेत असतानाही याबाबतचे कौशल्य देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले जाऊ शकतात.संगणक हार्डवेअर, नेटवर्किंगमध्ये करिअर : संगणकांची संख्या जशी अमर्याद वाढते आहे तेवढेच अमर्याद करिअर संगणक देखभाल, दुरुस्ती इत्यादींचे होत आहे. सॉफ्टवेअर पेक्षा जास्त मागणी हार्डवेअरमध्ये दिसू लागली आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यवसायात संगणक विभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे संगणक जुळवणी, विक्री, देखभाल, नेटवर्किंग इत्यादी क्षेत्रे अमर्याद विकसित झाली आहेत. त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बॅंका, रेल्वे, विमान कंपन्या, मनोरंजन क्षेत्रे, बीपीओ इत्यादी ठिकाणी करिअर घडू शकते.पात्रता : कुठल्या शाखेत पदवीधर आवश्यक ते संगणक ज्ञान, प्रशिक्षण घेऊन या करिअरमध्ये येऊ शकतो. पदवी शिक्षण घेत असताना मोकळ्या वेळेत संगणक ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येऊ शकते.क्षमता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र (एम.सी.पी., एम.सी.एस.ए. इत्यादी) प्राप्त करऊन घेणाऱ्यांना विशेष संधी आहेत हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य देणाऱ्या प्रशिक्षण योजनाही उपलब्ध आहेत.मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लीकेशन्स : विविध शाखेतील पदवीधारकांसाठी संगणक क्षेत्रातील चांगले करिअर करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळू शकते.कार्यक्षेत्र : आय टी कंपनीमध्ये प्रोग्रॅमर (योजक) म्हणून काम करता येईल. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी.सी.ए. इत्यादी पदवीधारक हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी क्षेत्रात करिअर करू शकतात.निवड निकष : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यासाठीसाधारणत : मार्च मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. साधारणपणे 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात आणि 200 गुणांची परीक्षा होते. गणित, इंग्रजी, लॉजिकी संबंधित हे प्रश्न असतात. खात्री असल्यासच प्रश्नोत्तर देणे योग्य ठरते कारण उत्तर चुकल्यास गुण उणे होतात हे लक्षात ठेवावे. प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण आणि पाहिजे असलेल्या संस्थांसाठी भरलेला आप्शन फॉर्म, यांच्यावर आधारित विद्यार्थ्यांना एम.सी.एच्या शिक्षण देणआर संस्थेत प्रवेश मिळतो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात गणित विषयांबरोबर संगणकासंबंधी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेस, इत्यादीबद्दल शिक्षण दिले जाते. शेवटच्या वर्षी एखाद्या कंपनीत प्रोजेक्टचे कामही करावे लागते. कॅम्पस् इंटरव्ह्यूमध्ये विविध परीक्षांतील सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकविणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड प्राधान्याने होते. यावेळी गटचर्चा, मुलाखत याद्वारे निवड निश्चित केली जाते.क्षमता वृद्धी : शिकत असतानाच काही परदेशी भाषा शिकणे, लवकर नोकरी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट : संगणकाच्या मदतीने व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक कामे सुकर होतात.कार्यक्षेत्र : माहिती तंत्रज्ञान शाखेत करिअर करता येते.पात्रता : आर्टस् कॉमर्स इत्यादी शाखेमधील पदवी. हा पदव्यूत्तर कोर्स करताना व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक विषयांचा अभ्यास करावा लागतो. शिवाय सॉफ्टवेअर मार्केटिंग इत्यादी विपणन विषयही शिकावे लागतात.बीएसस्सीनंतर आयआयटीमध्ये करिअर : आयआयटीसारख्या जागतिक मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकण्याचे स्वप्न फक्त इंजिनिअर होणाऱ्यांनीच बाळगावे, असे नव्हे. बी.एस्सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आय.आय.टी. संस्थेत प्रवेश मिळवून एम.एस्सी करू शकतात.कार्यक्षेत्र : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित, स्टॅटिस्टिक्स, काम्पुयटर ऍप्लीकेशन्, बायोटेक्नॉलॉजी व जिओफिजीक्स या विषयात एमएसस्सी करण्याची संधी आहे.निवड प्रक्रिया : बी.एस्ससीच्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या किंवा बी.एस्सी परीक्षेत 55 टक्क्यांपेका जास्त गुण मिळविणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेला बसावे लागते. यासाठी खालीलपैकी कोणतेही दोन विषय निवडून त्या विषयासाठीची आयोजित 3 तासांची लेखी परीक्षा द्यावी लागते.विषय : फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्, बायोटेक्नॉलॉजी, जिओफिजिक्स, जिऑलॉजी. बायोटेक्नॉलॉजी व कॉम्प्युटर अप्लिकेशन्स या विषयांचे पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात, तर इतर सर्व विषयांचे पेपर्स मात्र ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह (दीर्घ उत्तरी) प्ररकारचे असतात. दरवर्षी डिसेंबर/जानेवारी महिन्यात प्रवेश परीक्षेसंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध होतात.
सौजन्य : डॉ. अजित थेटे, सहसंचालक, तंत्रशिक्षण

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा