रविवार, ८ नोव्हेंबर, २००९

अपूर्ण राहिलेले शिक्षण करा पूर्ण..


घरची परिस्थिती गरीबीची असल्याने काही होतकरू गरीब विद्यार्थ्यांना दहावी- बारावीत शिक्षणाला रामराम ठोकावा लागतो. घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कमी वयात काही तरी व्यवसाय अथवा छोटी-मोठी नोकरी शोधावी लागते. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर काही वेगळेच आहे. ज्या वयात हातात पुस्तक पाहिजे असते, त्या वयात त्यांच्या हातात स्टोव्हच्या धुराने काळवंडलेले चहाचे पातेले असते. अशा काही होतकरू प्रौढ विद्यार्थ्यांचे या ना त्या कारणाने शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, त्यांना आता त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे सरसावल्या आहेत. अशा प्रौढ विद्यार्थ्यांनी मनावर घेतले तर ते त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करून तेच त्याच्या जीवनाला नवसंजीवनी देऊ शकतात.

1) इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी-
हे विद्यापीठ संपूर्ण भारतात कार्यरत असून या विद्यापीठातून सर्टिफिकेट, डिप्लोमा, पदवी व पदवीत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येते. या विद्या‍पीठात प्रवेश घेण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते. त्यासाठी पूर्ण वेळ महाविद्यालयात हजर राहण्याचीही आवश्यकता नाही. कामगार, संसारी स्त्रिया, खेड्यात राहणारे तसेच मध्यंतरी शिक्षण सोडलेल्या उमेदवारांना फावल्या वेळात या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता येते. व्यवस्थापन, समाजशास्त्र, फाइन आर्ट, अभियांत्रिकी, शेतकी डिप्लोमा आदी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क-
1) संचालक, इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी,(अॅडमिनिस्ट्रेशन अँण्ड इव्हॅल्युएशन) के- 76, हौजखास नवी दिल्लीClick here to see more news from this city 110 016.
2) संचालक, सिम्बॅयसिस इंटरनॅशनल कल्चरल अॅण्ड एज्युकेशन सेंटर, सेनापती बापट रोड, पुणे (महाराष्ट्र) 411 004.

2) यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
ज्यांनी वयाची 20 वर्षे पूर्ण केली आहे परंतु, जे 12 वी अनुत्तीर्ण आहेत त्यांना 3 ते 4 महिन्यांचा पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण करून वाणिज्य किंवा आर्ट शाखेतील पदवी प्राप्‍त करता येऊ शकते. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्यांना या विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीचे आपले स्वप्न पूर्ण करता येते. माध्यमिक शिक्षकांसाठी सेवातंर्गत शिक्षक प्रशिक्षण आणि बी.एड. करण्याची सोय या विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान व विकास या क्षेत्रात एम.फिल.ची सोय आहे. तसेच शेतकरीवर्गासाठीही विविध पिकासंदर्भात मार्गदर्शनपर अभ्यासक्रम सुरू केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
1) डी.जी. रूपारेल कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, माटुंगा रोड स्टेशन समोर, मुंबईClick here to see more news from this city -16
2) मॉडर्न कॉलेज, वाशी नवी मुंबई
3) के. ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, बंदर रोड ठाणे
4) ए.एस.पी कॉलेज, पनवेल.
5) आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रोड पुणे 4
6) नेस वाडिया कॉलेज, कॅ़म्प, पुणे 1
7) लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा
8) संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
9) सद्‍गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
10) नवभारत शिक्षण मंडळ, सांगली
11) अहमदनगर कॉलेज, अहमदनगर
11) आर्टस आणि कॉमर्स कॉलेज, जव्हार
12) महाराजा सयाजीराव गायकवाड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव कॅम्प, जि. नाशिक
13) जयहिंद महविदयालय, देवपूर
14) सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगपुरा, औरंगाबाद
15) आर.जी.बागडिया आर्टस, सायन्स एण्ड कॉमर्स कॉलेज, जालना
16) श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स एण्ड कॉमर्स परभणी
17) रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद
18) राजर्षि शाहू महाविद्यालय, लातुर
19) यशवंत महाविद्यालय, नांदेड
20) स्वामी रामनंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई
21) श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती
22) सी.पी व बेरार शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, तुळशीबाग, नागपूर
23) लक्ष्मीबाई राधाकिसन कॉलेज, अकोला
24) अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ
25) जशभाई मूळजीभाई पटेल महाविद्यालय, भंडारा
26) सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
27) मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
3) श्रमिक विद्यापीठ, मुंबई
या विद्यापीठाचे विशेष म्हणजे येथे कामगारांसाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यासाठी पूर्व शिक्षणाची कुठल्याही प्रकारची अट नाही. कामगारांच्या सोयीच्या वेळेत येथे अभ्यासक्रम शिकविले जातात. मराठी माध्यम असल्याने महाराष्ट्रातील होतकरू कामगारांना शिक्षण पूर्ण करण्याची उत्तम संधी आहे. वायरमन, वॉच दुरूस्ती़, टेलरिंग, बुक बाईंडिंग, ब्युटीशियन, भरतनाट्यम, सुतारकाम, सायकल रिपेअरिंग, बेकरी प्रॉडक्टस, स्क्रीन प्रिंटींग, बाहुल्या तयार करणे, नाट्य अभिनय, वेल्डींग, प्रथमोपचार, फिटर, बागकाम, रेडिओ व टेलिव्हिजन दुरूस्ती, मोटर वाईंडिंग, प्लंबिंग, फोटोग्राफी, रबर स्टॅम्प तयार करणे, राख्या तयार करणे, खडू तयार करणे, मेणबत्ती तयार करणे, जॅम व सरबत तयार करणे, काजू प्रक्रिया असे विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क-


श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्श नगर वरळी, मुंबईClick here to see more news from this city 422 433

4) बहि:स्थ अभ्यासक्रम
ज्यांचे शिक्षण अर्ध्यातूनच सुटलेले आहे. त्यांच्यासाठी भारतातील 31 विद्यापीठांनी टपालाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई विद्यापीठात 12 वी उत्तीर्ण असणार्‍यांसाठी बी.ए. आणि बी. कॉमचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम तर पदवीधरांसाठी एक वर्ष मुदतीचा फायनान्शियल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
1) संचालक, डायरेक्टोरेट ऑफ कॉरसपॉण्डन्स, कोर्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे, युनिव्हर्सिटी क्लब हाऊस, बी रोड चर्चगेट मुंबई.
2) एस.एन.डी.टी विमेन्स युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ कॉरसपॉण्डन्स कोर्से, जुहू, विद्याविहार, सांताक्रूझ(प) मुंबई
3) मा. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेश खिंड, पूणे
4) विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा न्यू आर्ट, सायन्स कॉलेज, अहमदनगर
5) विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा भाऊसाहेब हिरे वाणिज्य व अण्णासाहेब मुरकुटे विज्ञान महाविद्यालय, नाशिक
6) विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा जयहिंद साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा