गणिताचा अभ्यास म्हटला की, मुलांच्या चेह-यांवर नाराजी स्पष्ट दिसते यावर उपाय म्हणून गिरगाव येथे राहणारे विनायक बर्वे यांनी संगणकावर गणित सोडवण्यासाठी आगळंवेगळं ‘नोटपॅड’ तयार केलं आहे.
मुलांना आवडीच्या विषयाचा अभ्यास करायला सांगितला की, त्यांचा चेहरा खुलतो. परंतु, गणित हा बहुतेकांचा नावडता विषय, त्यामुळे गणिताचा अभ्यास म्हटला की, मुलांच्या चेह-यांवर नाराजी स्पष्ट दिसते. ते टाळाटाळ करू लागतात. त्यांच्या पोटात काय दुखेल, डोकं काय दुखेल, अशी नाना कारणं काढून अभ्यास टाळण्याचा प्रयत्न ती करून बघतात. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांची जुळवाजुळव करेपर्यंत त्रिकोणमिती, प्रमेय अशा किचकट कारणांमुळे बहुतांशी विद्यार्थ्यांचा गणित हा विषय नावडता झाला आहे. परीक्षेत जेमतेम गुण मिळतील, या बेतानेच त्यांचा अभ्यास सुरू असतो. परंतु, आता गणितात तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळावेत, म्हणून गिरगाव येथे राहणारे विनायक बर्वे यांनी संगणकावर गणित सोडवण्यासाठी आगळंवेगळं ‘नोटपॅड’ तयार केलं आहे. या नोटपॅडद्वारे अगदी दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकावर चुटकीसरशी गणित विषय समजावून घेता येणार आहे.
हल्ली शाळेतली लहानलहान मुलंही संगणकावर विविध प्रकारचे खेळ लीलया खेळतात। एकवेळ घरातल्या मोठ्यांना संगणकाची एखादी किमया माहिती नसते, पण मुलं मात्र आपल्या आईवडिलांनाच शिकवताना दिसतात. अशाच कम्प्युटरसॅव्ही मुलांसाठी बर्वे यांनी संगणकावर गणित सोडवण्यासाठी ‘नोटपॅड’ तयार केलं आहे. वहीवर गणिताची उजळणी करता करता वह्या भरून जातात, पण गणिताची समीकरणं काही डोक्यात घुसत नाहीत. संगणकावरचं हे नोटपॅड तब्बल दोन हजार पानांचं असून लिहिलेली पानं खोडून ती पुन्हा वापरता येतात. दुसरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे नोटपॅड उपयोगी आहे. सुपर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि. संस्थेने तयार केलेल्या मॅथमॅटिकल नोटपॅडचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी संगणकाच्या माध्यमातून गणिताचा अत्यंत सोप्या पद्धतीने सराव करावा, हा आहे. या विषयात असणारे अंकगणित, बीजगणित, भूमिती यातील गणित दररोज मराठी आणि इंग्रजीतून सोडवावीत. नोटपॅडमध्ये गणिताची दोन टूलबॉक्स असून ज्युनिअर टूलबॉक्स पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यात चिन्ह व साधनांच्या माध्यमातून गणितं स्वत: सोडवावी लागतात. सिनिअर टूलबॉक्समध्ये पहिली ते दहावीपर्यंत उपयोगी असणारी चिन्हं दिलेली आहेत. समजा, आपल्याला ३.५ त्रिज्येच्या वर्तुळात समभूज त्रिकोण काढायचा आहे. अशा वेळी बाजूला दिलेल्या टूलबॉक्सची चिन्हं वापरून हे गणित सोडवता येतं. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी टूलबॉक्स कसा हाताळावा, याची माहितीही दिलेली आहे. उदाहरणार्थ दहावीसाठी तयार केलेल्या सीडीमध्ये एसएससी बोर्डातर्फे तयार केलेला अभ्यासक्रम, त्यामध्ये असलेली उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत: सराव करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांसाठी चढता-उतरता क्रम बैजिक राशींसारखी मोठी उदाहरणं सहज सोडवता येतात. ब-याच विद्यार्थ्यांचे २ ते ३० पर्यंतचे पाढे पाठच नसतात. परंतु या नोटपॅडमध्ये‘हसत खेळत पाढे पाठ’ करण्याची ही सोय उपलब्ध केली आहे. शिवाय कंटाळा आला तर गेम्स आणि गाणी आहेतच. आहे की नाही धम्माल! मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांसाठी हे नोटपॅड आहेत. आपण कोणती गणितं सोडवलेली आहेत, ती नंतर बघण्याची यात सोय आहे. यामुळे मागील गणित करताना कोणत्या चुका झाल्या होत्या, हे लक्षात येऊन पुन्हा त्या होणार नाहीत, याचीही खबरदारी घेता येते. तसंच, मुलाने नोटपॅडवर दिवसभरात कोणता अभ्यास केला, हे पालकांनाही पाहता येणार आहे.
This सॉफ्टवेर will be available at following address। at Mumbai. Supergal Electronics Pvt. Ltd.162, Mohan Building, Laxmi Chawl,J. S. S. Road, Mumbai 400 004.Maharashtra. Contact. Mr. Vinayak BarvePlease contact on mobile Tel.No. 9222093864 or land line (022) 23871954.ईमेल : vinayakba@जीमेल.com, vmbarvevmb@yahoo.co.in
कीमत - ३२५ रु.
शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
The Perfect Wedding Band To Win - Titanium Arts
उत्तर द्याहटवाTITANY LOUIS – A wedding titanium white wheels band, that is titanium 170 welder exactly what it sounds like to create a ecosport titanium wedding ceremony in tube supplier a titanium ring for men traditional wedding venue.